आज काय घडलं?
१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिऱ्या;याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
आज यांचा जन्म
१९४३: रामदास फुटाणे - वात्रटिकाकार
१९२९: चाडली बेंडजेडीड - अल्जेरिया देशाचे ३रे अध्यक्ष (निधन: ६ ऑक्टोबर २०१२)
१९२७: द. मा. मिरासदार - विनोदी लेखक
१९२२: उस्ताद अली अकबर खान - मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: १८ जून २००९)
१९१९: शमशाद बेगम - पार्श्वगायिका (निधन: २३ एप्रिल २०१३)
१९१९: के. सरस्वती अम्मा - भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: २६ डिसेंबर १९७५)
१९१४: शांता हुबळीकर - अभिनेत्री (निधन: १७ जुलै १९९२)
१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: ६ डिसेंबर १९५६)
१८७२: अब्दुल्ला यूसुफ अली - भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक (निधन: १० डिसेंबर १९५३)
१६७५: महाराणी ताराबाई भोसले - मराठा साम्राज्याच्या महाराणी (निधन: ९ डिसेंबर १७६१)
१६२९: क्रिस्टियन हायगेन्स - डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक (निधन: ८ जुलै १६९५)
आज यांची पुण्यतिथी
२०१३: राम प्रसाद गोएंका - उद्योगपती (जन्म: १ मार्च १९३०)
१९९७: चंदू पारखी - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
१९६२: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया - स्थापत्य अभियंता आणि राजकारणी - भारतरत्न (जन्म: १५ सप्टेंबर १८६१)
१९५०: वेंकटरमण अय्यर - भारतीय तत्त्ववेत्ते (जन्म: ३० डिसेंबर १८७९)
Comments
Post a Comment