5/12/2025.. ताई साहेबांना जन्मदिनानिमित्त हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा 🌹🎂🌹 रजनी पाटील यांचा जन्म ५ : डिसेंबर १९५८ साली वाळवा जि. सांगली तालुक्यातील बहिरवडगाव येथे झाला होता. रजनी पाटील यांचे वडील आत्माराम पाटील स्वातंत्र्यसैनिक होते. राज्यात मंत्रिपद भूषविलेल्या अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्यांमध्ये रजनी पाटील यांचा समावेश होतो. मुंबई : रजनी अशोक पाटील यांनी राजकारणाची सुरवात विद्यार्थी दशेतच केली होती. पुणे विद्यापीठात १९७९ मध्ये सिनेटची निवडणूक जिंकून त्या चळवळीत सक्रिय झाल्या होत्या. रजनी पाटील यांनी एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपला राजकीय प्रवास सुरु केला होता. त्या १९७८ ते ८१ काळात त्या राज्याच्या ' एनएसयूआय' च्या सेक्रेटरी होत्या. तर १९८१ ते ८३ च्या काळात अखिल भारतीय स्तरावरील 'एनएसयूआय'च्या सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य : पाटील यांनी प्रथम प्रथम महाराष्ट्राच्या सरचिटणीस म्हणुनही काम केले आहे. तसेच त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करण्याची ...
Comments
Post a Comment