👆या लिंक्स अंतर्गत अनेक स्वरूपाचे पुस्तके आहेत,पुस्तके सर्च करीत असताना  खालील नंबर प्रमाणे क्लिक करणे  आवश्यक आहे.

 पेज नंबर.1

 नंतर पेज नंबर.2

   नंबर.3
   

 नंबर.4          
 

नंबर.5     
 डाऊनलोड केल्यानंतर  पीडीएफ ओपन होईल 
 

====================================

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  नामविस्तार दिनानिमित्त रिमोट ऍक्सेस सेवा :
👇 खालील प्रबंध या पद्धतीने सर्च करणे
 या नंतर....👇
खदासे यशवंत - पी.एचडी प्रबंध



लुलेकर पी जी - प्रबंध

जाधव सुदाम - प्रबंध



गीते सुहास - प्रबंध 



दरवंडे संजय - प्रबंध

शाह पी.एस.- प्रबंध



गजरे विलास - प्रबंध


=====================================

दिनविशेष :- 15/1/2024
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी :

जागतिक दिवस
राष्ट्रीय सैन्य दिवस.

महत्त्वाच्या घटना
१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.

१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

१८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.

१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

१९९९: गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: ? ? १८३८)

१८५६: भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी कुमार दत्त यांचा जन्म.

१९१८: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक यशवंत अग्रवाडेकर यांचा जन्म.

१९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

१९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)

१९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

१९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

१९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.

१९३८: भारतीय फुटबॉलर चुनी गोस्वामी यांचा जन्म.

१९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.

१९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.

१९८२: प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश यांचा जन्म.

*मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन*
१९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६)

१९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६)

१९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८)

२००२: विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: ? ? १९३५)

२००९: दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे तपन सिन्हा यांचे निधन.

२०१२: भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर होमाई व्यारावाला यांचे निधन.

२०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

२०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

=====================================
दिनविशेष:  दि.16/01/2024

महत्त्वाच्या घटना

छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक

१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.

१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.

१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.

१९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.

१९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.

१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण

१९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न

१९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.

१९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द

१९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलाव तरण झाले.

१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड

१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ’ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर

२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
१६३०: शिखांचे सातवे गुरु गुरु गुरु हर राय यांचा जन्म.

१८५३: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)

१९२०: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)

१९२६: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (मृत्यू: २८ जानेवारी २००७)

१९२७: भारतीय चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म.

१९४६: कबीर बेदी – चित्रपट अभिनेते

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१६६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)

१९०१: समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.

१९०९: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १८४२)

१९३८: शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)

१९५४: बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म: ३ जून १८९०)

१९६२: प्रसिद्ध लेखक राम नरेश त्रिपाठी यांचे निधन.

१९६६: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)

१९६७: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० डिसेंबर १९०१)

१९८८: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)

१९८९: तमिळ चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रेम नाझीर यांचे निधन.

१९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म: ? ? १९३३)

२०००: त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत (जन्म: ? ? १९१३ – बारामुल्ला, जम्मू काश्मीर)

२००३: रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)

२००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे (जन्म: ? ? ????)

 ग्रंथालय विभाग, नेकनूर...🌷

Comments

Popular posts from this blog

Dr. Babasaheb Ambedkar...

मा.रजनी ताई पाटील यांच्या विषयी ई माहिती :