दैनंदिन घडामोडी:
व्हिडीओ स्वरूपात :
दिनविशेष : 06 जुलै : -
महत्त्वाच्या घटना
१७३५ : मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
१७८५ : ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.
१८८५ : लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.
१८९२ : ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.
१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१९१० : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना
१९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
१९४४: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणून संबोधलं.
१९४७ : रशियात ए के ४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.
१९८२ : पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
२००६ : चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६)
१८३७ : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)
१८६२ : एल. के. अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
१८८१ : विदर्भातील संत गुलाबराव महाराज (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
१८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)
१९०१ : डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)
१९०५ : लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८
१९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)
१९२० : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)
१९२७ : व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१
१९३० : डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
१९३५: चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.
१९४६ : जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष
१९४६: अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.
१९५२ : रेखा शिवकुमार बैजल – मराठी साहित्यि
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१६१४: कच्छ प्रांताचे राजपूत राजा व मुघल बादशाहा अकबर यांचे विश्वासू सेनापती राजा मं सिंह यांचे निधन.
१८५४ : जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)
१९५४: ब्रिटीश कालीन भारतात कायद्याची पदवी ग्रहण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कॉर्नेलिया सोरबजी (Cornelia Sorabjee) यांचे निधन.
१९६२: नोबल पारितोषिक वेजेता प्रख्यात अमेरिकन कादंबऱ्या, लघुकथा, पटकथा, निबंध व नाटक लेखक विलियम फाकनर(William Faulkner) यांचे निधन.
१९८६ : ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)
१९९७ : चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९९९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)
२००२ : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी – पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
ग्रंथालय विभाग, नेकनूर...
Comments
Post a Comment