अर्थशास्त्र विभाग:

अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ढास सर यांचे हार्दिक अभिनंदन...

Indian Economics























ऑनलाईन पुसतकांची माहिती:






यादी :
  • अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश (डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी) - या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. (प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स)
  • डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - डायमंड प्रकाशन, लेखक व्ही.जी. गोडबोले).
  • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी, संपादक जी.आर. वर्मा)
  • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; हिंदी-इंग्रजी. लेखक बारबरा कोल्म, राजपाल प्रकाशन)
  • अर्थशास्त्र शब्दकोश (हिंदी, लेखक - सी.एस. बरला) (प्रकाशक जैन प्रकाशन नंदिर, जयपूर)
  • अर्थशास्त्र एवं वाणिज्यशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; लेखक - राज दत्त आणि रुद्र दत्त; प्रकाशन - एस.चंद पब्लिशिंग)
  • अर्थशास्त्र परिभाषा कोश (हिंदी, लेखक - सुदर्शन कुमार कपूर; प्रकाशक - राजकमल प्रकाशन)
  • डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
  • सुक्ष्म अशास्त्र {डाॅ. एस व्ही ढमढेरे) micro Economic
  • अर्थक्षेत्रातील मराठी तारे (उदय कुलकर्णी)
  • गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
  • ग्यानवाचे अर्थशास्त्र (न.वि. गाडगीळ)
  • जागतिक अर्थकारणाचे नवे संदर्भ (सी. पं. खेर)
  • नव्या जगाचे अर्थकारण (डॉ. मधुसूदन साठे)
  • पतसंस्था व्यवस्थापन (डॉ. अविनाश शाळीग्राम)
  • डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
  • बँकिंग जिज्ञासा (वंदना धर्माधिकारी)
  • भटकंती (रमेश पाध्ये)
  • भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
  • भारतीय अर्थव्यवस्था (सतीश श्रीवास्तव)
  • मैत्री बँकिंगशी (वंदना धर्माधिकारी)
  • शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (प्रा. नामदेवराव जाधव)
  • संघराज्याचा वित्त व्यवहार भाग १, २, ३ (डॉ. मधुसूदन साठे)
  • सी. ई. ओ. भूमिका व जबाबदारी (माधव गोगटे)
  • सूक्ष्म अर्थशास्त्र (डॉ. पुष्पा तायडे)
  • अर्थात (अच्युत गोडबोले  )
  • भारतीय अर्थव्यवस्था (देसाई ,भालेराव)
दिन विशेष माहिती :

दिनविशेष: - दि.04/07/2023

महत्त्वाच्या घटना

१०५४: वृषभ राशीत ’क्रॅब नेब्यूला’ दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.

१७८९: इस्ट इंडिया कंपनीने मराठा शासक पेशवा आणि निजाम शासक यांच्याबरोबर टिपू सुलतान यांच्या विरुद्ध खिलाफत ची संधी केली.

१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

१८८६: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.

१९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ

१९३६: ’अमरज्योती’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.

१९४६: सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान

१९९७: ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

१९९९: लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.

जन्मदिवस

१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६)

१८०७: जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता (मृत्यू: २ जून १८८२)

१८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)

१८९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)

१८७२: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)

१८८२: एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)

१९१२: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)

१९१४: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७

१९१६: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री नसीम बानो यांचा जन्मदिन.

१९८५: मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (मृत् यू: २१ डिसेंबर १९९७)

१९२६: विनायक आदिनाथ तथा ’वि. आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक (मृत्यू: १७ एप्रिल २०११)

१९६२: अमेरिकेच्या माजी व्यावसायिक टेनिसपटू पाम श्राइवर यांचा जन्मदिन.

१९७६: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल २००३)

१९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

मृत्यू

१७२९: कान्होजी आंग्रे – सेना सरखेल (जन्म: ? ऑगस्ट १६६९)

१८२६: जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५)

१८२६: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३)

१८३१: जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८)

१९०२: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. (जन्म: १२ जानेवारी १८६३)

१९३४: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)

१९६३: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

१९८०: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ’पाणकळा’, ’सराई’, ’पड रे पाण्या’, ’आई आहे शेतात’, ’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या. (जन्म: २४ एप्रिल १८९६)

१९८२: भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: ? ? १९१८)

१९९९: वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९)

                   Dr. Jyoti magar, neknoor..🌷

Comments

Popular posts from this blog

Dr. Babasaheb Ambedkar...

मा.रजनी ताई पाटील यांच्या विषयी ई माहिती :