महाराष्ट्र कृषी दिन:
व्हिडिओ :
दिनविशेष माहिती :
01 जुलै- दिनविशेष
जागतिक दिवस
महाराष्ट्र कृषी दिन
कॅनडा दिन: कॅनडा.
प्रजासत्ताक दिन: घाना.
केटी कोटी (मुक्ती दिन): सुरिनाम.
राष्ट्रीय डॉक्टर दिन
भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस
महत्त्वाच्या घटना
१६९३ : संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
१८३७ : जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१८७४: टंकलेखक (टाईपरायटर) – पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८८१ : कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.
१९०३: टूर दी फ्रान्स – पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.
१९०८: एसओएस (SOS) – हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०९ : क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.
१९१९ : कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.
१९३३ : नाट्यमन्वंतर संस्थेच्या ’आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९३४ : मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश
१९५५ : ’स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.
१९४७ : फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९४८ : बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना
१९४८ : ’कायदेआझम’ मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते ’स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्घाटन झाले.
१९४९ : त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.
१९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया – स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
१९६० : रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९६१ : महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.
१९६२ : सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६३: झिप कोड – अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
१९६४ : न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
१९६४: भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली.
१९६६: कॅनडा – देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.
१९७९: वॉल्कमन – सोनी कंपनीने हा मुसिक प्लेअर प्रकाशित केला.
१९९१ : सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ’वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ’नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.
१९९७ : शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
२००१ : फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय – स्थापना झाली.
२००७: इंग्लंड – देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
२०१५: डिजिटल इंडिया – या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
२०१७: देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवाकर (जीएसटी) संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
१६४६: प्रख्यात जर्मन गणितज्ञ व तर्कशास्त्र विद्वान गाटफ्रीड विलहेल्म लाइबनिज(Gottfried Wilhelm Leibniz) यांचा जन्मदिन.
१८८२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (मृत्यू: १ जुलै १९६२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१८८७ : कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू: ? ? १९२०)
१९१३ : वसंतराव जाईक – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)
१९३८ : प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बासुरी वादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्मदिन.
१९४९ : वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, भारताचे १३वे उपराष्ट्रपती
१९६१ : कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)
१९६६ : उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१८६० : चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (जन्म: २९ डिसेंबर १८००)
१९३८ : गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)
सर सी. वाय. चिंतामणी
सर सी. वाय. चिंतामणी
१९४१ : सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)
१९६२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (जन्म: १ ऑगस्ट १८८२)
१९६२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)
१९६९ : मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार
१९७१: सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता, )
१९८९ : प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ, ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत. (जन्म: ? ? ????)
१९९४ : राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक (जन्म: ? ? ????)
१९९९: एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)
💐💐💐💐💐💐*************💐💐💐💐💐💐
02 जुलै दिनविशेष :
महत्त्वाच्या घटना
२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे ०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
१९९४ : चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड
१९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९७२ : भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.
१९६२ : रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.
१९४० : सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१८५० : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल
१८६५ : ’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
१९३० : कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
१९२५ : पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१) १९२३ : जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी (मृत्यू: ? ? ????)
१९२२ : पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर
१९०४ : रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू: १२ आक्टोबर १९९६)
१८८० : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
२०११ : चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२००७ : दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
१९९९ : मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म: १५ आक्टोबर १९२०)
१९६१ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली (जन्म: २१ जुलै १८९९)
१९५० : युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१८४३ : डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म: १० एप्रिल १७५५)
१७७८ : रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म: २८ जून १७१२)
१५६६ : नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (जन्म: १४ डिसेंबर १५०3)
Dr. Jyoti magar... 🌺🌺
Comments
Post a Comment