जागतिक योग दिन















 व्हिडिओ


 दिनविशेष :

दिनविशेष : दि.21/06/2023

जागतिक दिवस :

हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस असतो.

महाकवी कालिदास जयंती [आषाढ शुद्ध प्रतिपदा]

जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.

महत्त्वाच्या घटना :

१७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

१८९८: अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.

१९४८: पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे

१९४९: राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
 
१९७५: इंग्लंड देशांत आयोजित क्रिकेट विश्वकप वेस्टइंडीज वेस्टइंडीज क्रिकेट संघाने प्रथम जिंकला.

१९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.

१९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

१९९१: भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.

१९९२: विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल ने21हरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर

१९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

१९९८: फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.

१९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.

२००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

२००९: भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

२०१४: संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांनी मिळून २१ जून या दिवशी ‘जागतिक योग दिवस’  साजरा करण्याच्या प्रस्तावास ११ डिसेंबर २०१४ साली मंजुरी मिळाली.

२०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
 
जन्मदिवस :

१७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.

१९०५: जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)

१९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)

१९१६: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू: २१ जानेवारी १९९८)

१९२३: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)

१९२७: रेमन मैग्सेसे पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय पत्रकार व ‘हिंदुस्तान टाईम्स’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राचे संपादक बी. जी. वर्गीज यांचा जन्मदिन.

१९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.

१९५२: जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९५३: बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)

१९५८: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१७)
 
१९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.
 
१९६७: थायलंड देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा(Yingluck Shinawatra) यांचा जन्मदिन.

मृत्यू :
 
१५२७: इटालियन नवनिर्मित काळातील मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि लेखक व इटली येथील आधुनिक राजकीय तत्वज्ञानाचे जनक निकोलो मैकियावेली (Niccolò Machiavelli) यांचे निधन.
 
१८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.
 
१८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.
 
१९२८: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

१९३२: आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ ब्रजभाषा कवि जगन्नाथदास रत्नाकर यांचे निधन.

१९४०: डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)

१९५७: नोबल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जोहन्नेस स्टार्क (Johannes Stark) यांचे निधन.

१९७०: सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ जून १९०१)

१९८४: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)

२००३: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

२०१२: भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)

२०१२: भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १९१८

                                     Dr. Jyoti magar..🌹

Comments

Popular posts from this blog

Dr. Babasaheb Ambedkar...

मा.रजनी ताई पाटील यांच्या विषयी ई माहिती :