🌺🌺 विनम्र अभिवादन...
* स्मृतिदिन निमित्त :
व्हिडिओ :
दिनविशेष :
राजमाता जिजाऊ स्मृतीदिन
जागतिक दिवस :
स्वातंत्र्य दिन (आईसलँड)
दुष्काळ आणि वाळवंटीकरण नियंत्रण दिवस
फादर्स डे – एल साल्वाडोर आणि ग्वाटेमाला
महत्त्वाच्या घटना :
१६३२: मुघल बादशाह शहाजहान याची पत्नी मुमताज हिचे निधन. तिच्या स्मरणार्थ शहाजहान याने आग्रा येथे ताजमहलची निर्मिती केली.
१७९९: फ्रांस सम्राट नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांनी इटली देश आपल्या साम्राज्यात सामावून घेतला.
१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
१९१७: महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे साबरमती आश्रमातील हृदय कुंज या टिकाणी रहायला गेले.
१९२९: सोवियत संघाने चीन बरोबर असणारे आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले.
१९३३: सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली
१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
१९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
१९४४: जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात हार मानली
१९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
१९७०: शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लॅन्टची शस्त्रक्रिया करण्यात आली
१९७२: वॉटरगेट कुभांड – डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
१९९१: भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
२००४: मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले.
२००८: ‘तेजस’ विमानाची पहिल्यांदाच यशस्वी चाचणी करण्यात आली.
२०१२: भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी इंडोनेशिया ओपन स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.
२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.
*जन्मददिवस*
१२३९: एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ७ जुलै १३०७)
१७०४: फ्लाइंग शटल चे शोधक जॉन के यांचा जन्म.
१८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.
१८८७: प्रख्यात भारतीय राजकारणी, मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री तसचं, पश्चिम बंगाल व ओरिसा राज्याचे माजी राज्यपाल कैलाशनाथ काटजू यांचा जन्मदिन.
१८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.
१९०३: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)
१९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७७)
१९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.
१९७३: लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू
१९८०: महान अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू वीनस विलियम्स(Venus Williams) यांचा जन्मदिन.
१९८१: शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन :
१२९७: ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)
१६३१: शाहजहानची पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)
१६७४: राजमाता जिजाऊ (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री) (जन्म: १२ जानेवारी १५९८)
१८५८: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.
१८३९: ब्रिटीश कालीन भारताचे १४ वे गव्हर्नर जनरल(राज्यपाल) लॉर्ड विलियम बेटिंक(Lord William Bentinck) यांचे निधन.
१८६५: ब्रिटीश कालीन भारतातील ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग (Lord Canning)यांचे निधन.
१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)
१८९५: गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (जन्म: १४ जुलै १८५६)
१९२८: पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (जन्म: ९ आक्टोबर १८७७)
१९६५: मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०
१९८३: शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक.
१९९६: मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)
२००४: इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.
डॉ.ज्योती मगर ( ग्रंथपाल )...
Comments
Post a Comment