वाचनाचे महत्व
विद्यार्थी वाचन कक्ष
विद्यार्थीनीं वाचन कक्ष वाचन संस्कृती वाचनाचे महत्व
व्हिडीओ :
17 डिसें दिनविशेष घटना :
१७ डिसेंबर महत्वाच्या घटना
〉
१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
〉
१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
〉
१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
〉
१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
〉
१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
〉
१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
〉
२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
〉
२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
〉
२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
〉
२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.
१७ डिसेंबर जन्म
〉
१७७८: विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८२९)
〉
१८४९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९०९)
〉
१९००: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
〉
१९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
〉
१९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
〉
१९११: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
〉
१९३४: पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
〉
१९४७: दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer) दीपक हळदणकर यांचा जन्म.
〉
१९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म.
〉
१९७८: अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.
१७ डिसेंबर मृत्यू
〉
१७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन.
〉
१९०७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन. (जन्म: २६ जून १८२४)
〉
१९२७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन. (जन्म: २६ जून १८२४)
〉
१९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
〉
१९३८: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १८७६ – चांचल, माल्डा, बांगला देश)
〉
१९५६: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९८)
〉
१९५९: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
〉
१९६५: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०६)
〉
१९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९२४)
〉
२०००: अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन.
〉
२००१: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)
डिसेंबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना
डॉ.मगर जे एस ...🌺
Comments
Post a Comment